03 August 2010

संस्कार भारती -- पश्चिम महाराष्ट्र प्रांताची बैठक २०१०

पश्चिम महाराष्ट्र प्रांताची बैठक नुकतीच पुण्यात आनंद मंगल कार्यालयात दिनांक ३१ जुलै व ०१ ऑगस्ट ह्या दोन दिवशी संपन्न झाली.
पहिल्या दिवशी दुपारी उद्‍घाटन झाले. त्या नंतर चर्चात्मक विविध सत्रे झालीत.
रात्री ९ ला " तेजोनिधी सावरकर " हा कार्यक्रम झाला.
ही त्याची चलत क्षण चित्रे


पहिले चलत चित्र :-
सुरुवातीला संस्कार भारतीचे ध्येय गीत झाले





नंतर ची दोन्ही चलत चित्रे आहेत --  स्वा. सावरकर ह्यांच्या ’जयोस्तुते श्री महन्मंगले ’ ह्या गीतावरील नृत्याने सुरुवात झाली त्याची












दुसऱ्या दिवसाच्या पहाटे ६ ला श्री.दिलीप काळे ह्यांचे संतूर वादन व पं अरविंद्कुमार आझाद ह्यांचा तबला अशी दोघांनी अहिरभैरव रागात जुगलबंदी सादर केली.

त्यानंतर ही विविध सत्रे झालीत. आगामी वर्ष हे पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या स्थापनेचे पंचविसावे असल्याने विविध कार्यक्रमांची रूपरेषा ठरविली गेली.  नविन कार्यकारिणीची घोषणा झाली. श्री राहूल सोलापूरकर ह्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.

16 July 2010

नृत्य साधनेचे दुसरे पुष्प !

गेल्या महिन्यात मासिक नृत्य साधनेस जोरात सुरूवात झालेली होती त्यामुळॆ दुसऱ्या पुष्पा बद्दल प्रेक्षकांच्या अपेक्षा अर्थातच अधिक वाढलेल्या होत्या.

संस्कार भारती पुणे, च्या वतीने आज शनिवारी दिनांक १० जुलै २०१० रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात मासिक नृत्य साधनेच्या दसऱ्या पुष्पास तितक्याच दिमाखात सुरूवात झाली. ठरल्या प्रमाणे आजच्या नृत्यांगना होत्या अमृता सहस्रबुध्दे व आजच्या प्रमुख पाहूण्या होत्या भरतनाट्यम शिकविण्यात गेली सतरा वर्षे कार्यरत आहेत अश्या गुरूवर्य संध्या धर्म आणि संभाजी भागाच्या  पालक सौ. विनया देसाई ह्यांनी सुरुवातीला नटराजाची पुजा केली.

नंतर संस्कार भारतीचे ध्येय गीत  सौ. हिमानी लिमये ह्यांनी सादर केले. लगेचच प्रसिध्द नृत्यांगना अमृता सहस्रबुध्दे ह्यांनी  भरतनाट्यम  ह्या त्यांच्या खास शास्त्रीय नृत्य शैली तून आपल्या एकेक रचना सादर करीत प्रस्तुत नृत्य साधनेचे दुसरे पुष्प श्री मृत्युंजयेश्वराला अर्पण करीत उपस्थित श्रोतृवर्गाला मंत्रमुग्ध केले.

अश्याच पध्दतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी, येत्या वर्षभर नृत्य साधना  हा नूतन कार्यक्रम विविध नृत्य कलाकारांच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाची पुढील वर्षभर व्यवस्था पहाण्याची जबाबदारी सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांनी स्विकारलेली आहे. ह्या दसऱ्या पुष्पाच्या सादरी करणा नंतर त्या सर्व कार्यक्रम संपूर्ण ताकदीने पार पाडतील अशी आता खात्री वाटते.

आजच्या कार्यक्रमाला श्रोतृवर्ग भरपूर संख्येने उपस्थित होता.

ह्या कार्यक्रमा  ची काही  छाया चित्रे  व चित्र-फिती




























गणेश वंदना


शिवस्तुती


स्वरजती




वात्सल्य - अर्थात बालकृष्ण






07 June 2010

मासिक नृत्य साधनेस सुरूवात झाली !



संस्कार भारती संभाजी भाग, पुणे ह्यांच्या वतीने आज शनिवारी दिनांक ५ जून २०१० रोजी संध्याकाळी ७ वाजता  कर्वे रस्त्या वरील श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात मासिक नृत्य साधनेची दिमाखात सुरूवात झाली. ठरल्या वेळेप्रमाणे सौ. किशोरी कलघटगी ह्यांनी माईकचा ताबा घेत सूत्र संचालनास सुरूवात केली.

हा त्याचा चलीत अंश पहा




नंतर  संघटन मंत्री श्री. सारंग कुलकर्णी ह्यांनी प्रास्ताविकात संस्कार भारतीची पूर्व पिठीका व ह्या संस्थेच्या कार्याची व निरनिराळ्या उपक्रमांची माहीती दिली..

आजच्या प्रमुख नृत्यांगना सौ. स्वप्ना कुर्डुकर , प्रमुख उपस्थित प्रसिध्द ज्येष्ठ गायिका सौ शोभा अभ्यंकर व संभाजी विभागाच्या  भाग प्रमुख सौ. माधुरी जोशी ह्यांनी सुरुवातीला नटराजाचे पूजन केले..


हा त्याचा चलीत अंश पहा

त्यानंतर संस्कार भारतीचे ध्येय गीत झाल्यावर प्रमुख पाहुण्यांच्या ओळखी झाल्या.

ज्येष्ठ गायिका सौ शोभा अभ्यंकर  ह्यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाची पूर्वपिठिका विशद केली.


हा त्याचा चलीत अंश पहा

सौ. गीता कोलंगडे ह्यांनी थोडक्यात आभार मानलेत
 हा त्याचा चलीत अंश पहा

त्या नंतर प्रसिध्द नृत्यांगना सौ. स्वप्ना कुर्डुकर ह्यांनी आपल्या शास्त्रीय नृत्यातून आपल्या एकेक रचना सादर करीत व प्रस्तुत नृत्य साधनेचे पहिले पुष्प ओवीत सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

हा त्याचा चलीत अंश पहा





हा त्याचा चलीत अंश पहा

हा त्याचा चलीत अंश पहा








हा त्याचा चलीत अंश पहा





हा त्याचा चलीत अंश पहा

सगळ्यात महत्वाचे म्हणजे सौ. स्वप्ना कुर्डुकर ह्यांनी, संस्कार भारती ही अखिल भारतीय संस्था संपूर्ण देशभर आपल्या पंधराशेहून अधिक शाखांमार्फत विविध कलांच्या माध्यमातून करीत असलेल्या कार्यां बद्दल आस्था दाखवली. एव्हढेच नव्हे तर त्यांनी स्वत:हून ह्या संस्थेचा आजपासून कार्यकर्ता होण्याचा मानस जाहिर केला. अश्याच पध्दतीने संस्कार भारतीशी अनेक कलाकार कार्यकर्ते संलग्न झालेले आहेत.

हा आहे जमलेला श्रोतृवर्ग


अश्याच पध्दतीने ह्या पुढे प्रत्येक महीन्याच्या दुसऱ्या शनिवारी येत्या वर्षभर नृत्य साधना  हा नूतन कार्यक्रम विविध कलाकारांच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाची मूळ कल्पना सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांची आहे. त्या स्वत: एक  उत्तम नृत्यांगना असून  त्यांनी पुढील वर्षभर ह्या कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी स्विकारली आहे.


ह्यापुर्वी अश्याच पध्दतीने ह्याच देवालयात प्रथित यश गायकांकडून एक वर्ष भर संगीत साधना सादर केली गेली होती, ह्याची आठवण काढीत अनेक उपस्थित श्रोत्यांनी ह्या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात

ह्या पुढेही सादर होणाऱ्या कार्यक्रमांना श्रोतेवर्ग आवर्जून उपस्थित राहून सहकार्य करतीलच.

दैनिक जागरण सिटी प्लस मध्ये आलेला वृत्तांत

03 June 2010

मासिक नृत्य साधना




संस्कार भारती पुणे सहर्ष सादर करीत आहे. एक वर्ष भर प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी  कर्वे रस्त्या वरील श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात मासिक नृत्य साधना सादर केली जाईल. त्यावेळी प्रसिध्द नृत्यांगना शास्त्रीय नृत्यातून आपली कला देवालयात सादर करतील. ह्यापुर्वी अश्याच पध्दतीने ह्याच देवालयात आपण एक वर्ष भर संगीत साधना सादर केलेली होती.

ह्या नृत्य साधनेचे पहिले पुष्प येत्या शनिवारी दिनांक ५ जून २०१० रोजी संध्याकाळी ७ वाजता, सौ. स्वप्ना कुरूडकर ह्या भरतनाट्यम मधील आपल्या  रचनातून सादर करणार आहेत.

त्यावेळी प्रसिध्द ज्येष्ठ गायिका सौ शोभा अभ्यंकर ह्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सर्वांनी ह्या पहिल्या व यानंतर सादर होणाऱ्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहावे.

श्रीयुत रवि देवांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत




काल २ जून रोजी मुंबईला जाण्याचा योग आला. अश्या वेळी तेथील जहांगीर आर्ट गॅलरीत येत्या ३ जून पर्यंत चालू असलेल्या श्रीयुत रवि देवांच्या चित्रांच्या प्रदर्शनाला जाणार नाही हे कधी तरी शक्य आहे का ? माझ्या समवेत श्री. सुहास वागळे व श्री रघुवीर भरम हे पण आलेले होते. अर्थातच श्री. रवि देवांना आम्हा तिघां पुणेकर संस्कार भारतियांना पाहून मनापासून आनंद होणे हे अगदि स्वाभाविकच होते. तशी ह्या प्रदर्शनातील त्यांची बहुतांश चित्रे प्रत्यक्ष काम चालू असतांना पहायला मिळालेली होती, पण आता ती आर्ट गॅलरीत पहायला मिळणे हा एक अपूर्व भाग्याचा दिवस आहे. माझ्या बऱ्याच मित्र मैत्रीणींना ती पहायला न मिळणे शक्य आहे अश्यांच्या सोयी साठी खाली काही क्षणचित्रे सादर करीत आहे.











01 May 2010

दखल दैनिक जागरण, सिटी प्लस, ने घेतलेली

संस्कार भारती, संभाजी भाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने वस्तू आणि व्यक्ती चित्रणाचे साप्ताहिक वर्ग शनिवार दिनांक १७ एप्रिल २०१० पासून दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत  श्री. मृत्युंजयेश्वर मंदीर, कर्वे रोड, पुणे येथे सुरू झाले आहेत. ह्या वर्गाची दखल दैनिक जागरण, सिटी प्लस, कोथरूड / पौड रोड, ह्यांनी त्यांच्या बुधवार दिनांक २८ आप्रिल,२०१० च्या अंकात घेतली.




फोटोवर क्लिक करा !

ह्या वर्गाचे शुल्क अत्यल्प म्हणजे रुपये २००/- फक्त संपूर्ण वर्षासाठी असणार आहे ( एप्रील ते मार्च ). ह्या वर्गाला येणाऱ्यांना दर रविवारी वरील शुल्कात ठिकठिकाणी होणाऱ्या निसर्गचित्रण वर्गालाही उपस्थित रहाता येणार आहे. तसेच ह्या वर्गाला वेळोवेळी मान्यवर चित्रकारांचे मार्गदर्शनही उपलब्ध होणार आहे. ह्या वर्गाला कोणत्याही वयाच्या स्त्री पुरूषास प्रवेश घेता येईल. ज्यांना चित्रकलेची मनापासून आवड आहे व नित्य नियमाने सराव करण्याची इच्छा आहे, अश्यांना ह्या वर्गाचा निश्चितपणे लाभ करून घेता येणार आहे.

30 April 2010

स्नेह मेळावा







काल म्हणजे २९ एप्रिल २०१० रोजी संस्कार भारतीच्या संभाजी भाग व पुणे महानगरा मार्फत स्नेह मेळावा संपन्न झाला.

संस्कार भारती या अखिल भारतीय स्तरावर कलांच्या माध्यमातून संस्कार क्षम समाज घडविण्याचे काम करणाऱ्या संस्थेची पुण्यात स्थापना होण्याच्या घटनेला चोवीस वर्षे पूर्ण होऊन रौप्य वर्षात पदार्पण होत आहे.

पुण्यात त्या क्षणाचे औचित्य साधून भव्य कार्यक्रमाची तयारी करण्याचे मनसुबे सुरू आहेतच. संस्कार भारतीच्या एकूण कार्यप्रणालीत संघटनेचे महत्व आपण सर्वच जाणून आहोत व त्यालाच केंद्र स्थानी ठेवून आज सारे कार्यकर्ते उत्सव मंगल कार्यालयात जमलो होतो. आजचा हा मेळावा आहे , नित्याची बैठक नाही हे आवर्जून सांगीतले गेले.

त्या साठी ध्येय गीत व एका समूह गीता नंतर संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेतला गेला व सर्व कार्यकर्ते आपसूकच अधिक मोकळे झाले.

मग झाली ती मुक्त चर्चा, विषय अर्थातच संघटनात्मक वृध्दी साठी काय केले पाहिजे? त्या साठी एक प्रश्नावली पण उपलब्ध केली, जी प्रत्येकाने भरून दिली. ती मते नंतर एक गठ्ठ्याने चहापानाचे वेळी श्री. शामराव जोशीं कडे सुपूर्त केली पुढील अभ्यासा साठी !

त्यानंतर श्री. शामराव जोशी, उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रांत ह्याचे पुढे तासभर अस्खलित व नेटके मार्गदर्शन पर भाषण झाले.

खिचडी व कढीचा पोटास आधार देत कार्यक्रमाची सांगता झाली.



१) श्री. शामराव जोशी, ह्यांचे मार्गदर्शन चालू असतांना.





२) कार्यकर्ते मन लावून भाषण ऐकण्यात तल्लीन.