19 September 2010

मासिक नृत्य साधनेचे चौथे पुष्प !




संस्कार भारती संभाजी भाग, पुणे, च्या वतीने शनिवारी दिनांक १८ सप्टेंबर २०१० रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात मासिक नृत्य साधनेचे चौथे पुष्प सम्पन्न झाले. खरे तर दुसऱ्या शनिवारी गणेशोत्सवाची सुरुवात होत असल्याने हे पुष्प नेहमीप्रमाणे दुसऱ्या ऐवजी तिसऱ्या शनिवारी ठेवले गेले. ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संभाजी भागाच्या मातृशक्ती प्रमुख सौ. गीता कोलंगडे ह्यांनी पार पाडले

ह्यावेळी कुचिपुडी हा नृत्य प्रकार सादर करणाऱ्या नृत्यांगना होत्या कोहिनूर दर्डा.  त्याच्या बरोबर त्यांची मैत्रीण पुर्वा गोडबोले ज्या कथक मधे तरबेज आहे, ह्यांनीही हजेरी लावली ! . ह्या दोघींनी कार्यक्रमाच्या  शेवटी आपापल्या नृत्यशैली्चे सादरीकरण एका जुगलबंदीने करून एकूण कार्यक्रमाला खूपच उंचीवर नेऊन पोहोचवले.

आजच्या प्रमुख पाहूण्या होत्या निलिमाताई आध्ये, पुण्यातील प्रसिध्द नृत्यगुरू रोहिणी भाटे ह्यांच्या त्या शिष्या. तसेच गांधर्व महाविद्यालयातून व फर्ग्युसन मधून कथक नृत्यामधे प्रथम क्रमांकाने एम ए झाल्या. ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ, व गुरू रोहिणी भाटे ह्यांच्या नृत्य अ‍ॅकेडमीतून अध्यापन केले. स्वत:च्या ’प्रकृति कथक’  ह्या नृत्यालयाला पंधरा वर्षे झाली आहेत.नवे नवे प्रयोग करणे , नत्य विषयक लेखन करणेव्याख्याने देणे व नवनवीन शिष्या तयार करणे हे त्यांचे कार्य अखंडितपणे चालूच आहे. गणित हा ही त्यांच्या आवडत्या विषया पैकी एक, त्यात एम एस करून गणितातही अध्यापन केले होते.

प्रथम ह्या तिघी व पुणे महानगराचे संघटन मंत्री श्री. मिलिंद भोळे ह्यांनी नटराजाची पूजा केली. त्या नंतर सौ. स्वाती देव ह्यांनी संस्कार भारतीचे ध्येय गीत म्हटल्यावर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

आजच्या नृत्यांगना कोहिनूर दर्डा ह्यांनी त्यांच्या खास कुचिपुडी ह्या शास्त्रीय नृत्य शैलीतून आपल्या एकेक रचना सादर करीत प्रस्तुत नृत्य साधनेचे चौथे पुष्प श्री मृत्युंजयेश्वराला अर्पण केले. कोहिनूर दर्डा ह्यांनी त्यांचे कुचिपुडी नृत्याचे शिक्षण आपल्या गुरू सौ. गायत्री आंबेकर ह्यांचे कडून घेतले. सौ. गायत्री आंबेकर ह्यांनी हैदराबाद तेलगु युनिव्हर्सिटीतून कुचिपुडी नृत्यात एम ए केलेले आहे. तसेच कोहिनूर, गेली अकरा वर्षे प्रख्यात नृत्यांगना सौ. स्वाती दैठणकर ह्यांच्या कडे भरतनाट्यम शिकत आहेत.

शालेय शिक्षणातही कोहिनूर नेहमीच पुढे राहिल्या आहेत !  अभिनव मधून दहावीच्या परिक्षेत त्यांना ९२ % मार्क्स पडले होते. पुढेही त्यांनी आपला अग्रक्रम कायम राखीत  फर्ग्युसन मधून जर्मन भाषेत प्रथम येत मॅक्समुलरभवनची सलग दोन वर्षे स्कॉलरशिप मिळवीत दोनदा जर्मनीस जाऊन तिथेही आपल्या कलेचा ठसा उमटविला. इतर अनेक स्पर्धांमधून व सादरी करणांतून त्यांनी आपली चमक दाखवलेली आहे व आपले नाव सार्थ केले आहे !

अश्याच पध्दतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी, येत्या वर्षभर नृत्य साधना  हा नूतन कार्यक्रम विविध नृत्य कलाकारांच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाची पुढील वर्षभर व्यवस्था पहाण्याची जबाबदारी सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांनी स्विकारलेली आहेच.
नेहमीप्रमाणेच ह्याही कार्यक्रमाला श्रोतृवर्ग भरपूर संख्येने उपस्थित होता.

ह्या कार्यक्रमाची ही काही  छाया चित्रे .

नटराज पूजन

एक मुद्रा

एक रौद्र मुद्रा
अजून एक मुद्रा


कोहिनूर दर्डा, निलिमा आध्ये व  पूर्वा गोडबोले

तर ह्या आहेत  काही चित्र-फिती

ध्येयगीत



.
तांडवनृत्य करी गजानन




 गोपालकृष्ण स्तुती


थाळी नृत्य

जुगलबंदी


गुरुंचे विचार : निलिमा आध्ये

10 September 2010

नृत्य साधनेचे तिसरे पुष्प

नृत्य साधनेचे तिसरे पुष्प नित्य नेमा प्रमाणे १४ ऑगष्ट २०१० रोजी संध्याकाळी सात वाजता श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात संपन्न झाले. सर्व प्रथम कु. हर्षदा भोळे हिने संस्कार भारतीचे ध्येय गीत सादर केले.

ह्या कार्यक्रमाला सौ. स्वाती दैठणकर ह्या प्रमुख पाहुण्या लाभल्या होत्या.श्रीयुत रवि देव ह्यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. नुकत्याच पार पडलेल्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमी वर प्रमुख पाहुण्यांनी, प्रत्येक कलाकाराच्या हृदयात ठसलेल्या नटराज दैवताबद्दल ची माहिती तसेच गुरुचे कलाकाराच्या आयुष्यातील अढळ स्थान आदि मुद्दे विस्तारून सांगत सर्वांना मार्गदर्शन केले.

आजच्या नृत्यांगना अमृता परांजपे ह्यांनी आपल्या कथ्थक नृत्य शैलीत  प्रथम गुरुवंदना  व नंतर ताल प्रस्तुती सादर केली. तसेच त्यांनी अभिनयाची  खासीयत दर्शविणारी काही पदे ही सादर केलीत. त्या प्रख्यात गुरू सौ. शांभवी वझे ह्यांच्या शिष्या आहेत. नृत्य व अभिनय हे त्यांचे वैशिष्ठ्य असून त्यांनी सर्व प्रेक्षकांना सुमारे तास भर मंत्रमुग्ध केले होते.

आजच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांनी केले.

ही आहेत काही क्षणचित्रे


.