10 September 2010

नृत्य साधनेचे तिसरे पुष्प

नृत्य साधनेचे तिसरे पुष्प नित्य नेमा प्रमाणे १४ ऑगष्ट २०१० रोजी संध्याकाळी सात वाजता श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात संपन्न झाले. सर्व प्रथम कु. हर्षदा भोळे हिने संस्कार भारतीचे ध्येय गीत सादर केले.

ह्या कार्यक्रमाला सौ. स्वाती दैठणकर ह्या प्रमुख पाहुण्या लाभल्या होत्या.श्रीयुत रवि देव ह्यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. नुकत्याच पार पडलेल्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमी वर प्रमुख पाहुण्यांनी, प्रत्येक कलाकाराच्या हृदयात ठसलेल्या नटराज दैवताबद्दल ची माहिती तसेच गुरुचे कलाकाराच्या आयुष्यातील अढळ स्थान आदि मुद्दे विस्तारून सांगत सर्वांना मार्गदर्शन केले.

आजच्या नृत्यांगना अमृता परांजपे ह्यांनी आपल्या कथ्थक नृत्य शैलीत  प्रथम गुरुवंदना  व नंतर ताल प्रस्तुती सादर केली. तसेच त्यांनी अभिनयाची  खासीयत दर्शविणारी काही पदे ही सादर केलीत. त्या प्रख्यात गुरू सौ. शांभवी वझे ह्यांच्या शिष्या आहेत. नृत्य व अभिनय हे त्यांचे वैशिष्ठ्य असून त्यांनी सर्व प्रेक्षकांना सुमारे तास भर मंत्रमुग्ध केले होते.

आजच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांनी केले.

ही आहेत काही क्षणचित्रे


.









No comments: