संस्कार भारती ही कलांच्या माध्यमातून व सर्व कलाकारांना एकत्र आणून सध्या लोप पावत चाललेल्या संस्कारांची जपणूक व जोपासना करण्याचे कार्य आपल्या भारतभर पसरलेल्या पंधराशेहून अधिक शाखांच्या माध्यमातून जोमाने करीत आहे. संस्कार भारती, पुणे, हा कदाचित एक-पंधराशेवा-अंश असावा. हा ब्लॉग म्हणजे पुणे महानगरातून होत असलेल्या कार्यक्रमांची एक झलक ! आपणही ह्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी व्हावेत हीच ईच्छा !
30 April 2010
स्नेह मेळावा
काल म्हणजे २९ एप्रिल २०१० रोजी संस्कार भारतीच्या संभाजी भाग व पुणे महानगरा मार्फत स्नेह मेळावा संपन्न झाला.
संस्कार भारती या अखिल भारतीय स्तरावर कलांच्या माध्यमातून संस्कार क्षम समाज घडविण्याचे काम करणाऱ्या संस्थेची पुण्यात स्थापना होण्याच्या घटनेला चोवीस वर्षे पूर्ण होऊन रौप्य वर्षात पदार्पण होत आहे.
पुण्यात त्या क्षणाचे औचित्य साधून भव्य कार्यक्रमाची तयारी करण्याचे मनसुबे सुरू आहेतच. संस्कार भारतीच्या एकूण कार्यप्रणालीत संघटनेचे महत्व आपण सर्वच जाणून आहोत व त्यालाच केंद्र स्थानी ठेवून आज सारे कार्यकर्ते उत्सव मंगल कार्यालयात जमलो होतो. आजचा हा मेळावा आहे , नित्याची बैठक नाही हे आवर्जून सांगीतले गेले.
त्या साठी ध्येय गीत व एका समूह गीता नंतर संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेतला गेला व सर्व कार्यकर्ते आपसूकच अधिक मोकळे झाले.
मग झाली ती मुक्त चर्चा, विषय अर्थातच संघटनात्मक वृध्दी साठी काय केले पाहिजे? त्या साठी एक प्रश्नावली पण उपलब्ध केली, जी प्रत्येकाने भरून दिली. ती मते नंतर एक गठ्ठ्याने चहापानाचे वेळी श्री. शामराव जोशीं कडे सुपूर्त केली पुढील अभ्यासा साठी !
त्यानंतर श्री. शामराव जोशी, उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रांत ह्याचे पुढे तासभर अस्खलित व नेटके मार्गदर्शन पर भाषण झाले.
खिचडी व कढीचा पोटास आधार देत कार्यक्रमाची सांगता झाली.
१) श्री. शामराव जोशी, ह्यांचे मार्गदर्शन चालू असतांना.
२) कार्यकर्ते मन लावून भाषण ऐकण्यात तल्लीन.
Subscribe to:
Posts (Atom)