11 July 2011

रविवारचा साप्ताहिक निसर्गचित्रण वर्ग

कालचा दिवस खरचंच उत्साह जनक होता. आज निसर्ग चित्रणा साठी आम्ही गोखले इन्स्टीट्युट मध्ये गेलो होतो. तशी आज पावसाची बर्‍यापैकी उघडिप होती. अधून मधून सूर्यदेव चक्क दर्शनही देत होते ! त्यातच आज तिथे एका सिनेमाचे शुटींग ही चालू होते. काय गोष्ट आहे ते काही फारसे कळले नाही, परंतू बर्‍याच लहान मुली तिथे खेळतांना दिसत होत्या. मध्येच " कट " आवाज व्हायचा व हे खेळणे खिदळणे  थांबायचे ! कुठल्याश्या गाण्यावर शुटींग चाललेले असल्याने पुन्हा तेच गाणे सुरू व्हायचे व मुलींचा खेळण्याचा गोंधळ सुरू व्हायचा, असे आलटून पालटून चालू होते.

ही पहा त्याची क्षणचित्रे






आणि ही एक छोटीशी क्लीप तुम्हीहि क्षणभर त्यांच्या आनंदात सामील व्हा !




तेव्हढ्या काळात मी माझे हे एक निसर्ग चित्रण संपविले, कसे आहे कॉमेंट्स द्यायला विसरू नका.



हे सर्व काही चालू असतांनाच, एक वेडगळ दिसणारी बाई इकडून तिकडून येरझार्‍या घालतांना दिसली, केस पिंजारलेले व पिवळट मळकट पंजाबी ड्रेस घातलेला, पण कानात इयर फोन लावून कुठलेसे गाणे ऐकण्यात तल्लिन झालेली ! मला तिची ही छबी का कोण जाणे एकदम आवडून गेली व मनात विचार आला की हिचे पोर्ट्रेट काढायला मिळाले तर ?

असा विचार मनात यायला व शेजारीच बसून माझे चित्रण बघत असलेला त्यांच्यातील एक ज्युनीअर आर्टीस्ट मला म्हणाला की , "तुम्ही पोर्ट्रेट्स सुध्दा काढता का ? "

मी म्हणालॊ, " हो काढतो की " व त्या मघाच्या तिथूनच जात असलेल्या बाई कडे वळून त्याला दाखवत म्हणालॊ , " ह्यांचे  काढायला मिळाले तर  ? "

तो म्हणाला " अहो एव्हढंच ना?  मग बसतील की त्या , मी सांगू का त्यांना " असे महणत तो उठून त्यांचे पाशी गेला. त्यांची एकमेकांशी ओळख असावी, लगेचच त्या तयार होऊन बसल्या की त्या पुढे येऊन ! अगदि अजिबात न हालता , मग काय केली सुरूवात व अगदि आत्मविश्वासाने  काढले त्यांचे पोर्ट्रेट !

मग कळले की हे वेडगळ पणाचे सोंग त्यांना त्या सिनेमात वठवावयाचे आहे व म्हणून मेक अप करून मधे वेळ होता म्हणून त्या हिंडत वेळ काढीत होत्या.  मग त्त्यांचेशी  ओळख व  गप्पा सुरु झाल्यात  त्यांचे नाव आहे  ज्योती भावे- मते ! सिनेमा नाटके असतेच.  त्या उत्तम नृत्यांगना पण आहेत. मुख्य म्हणजे त्या फेस बुक वर ही अ‍ॅक्टीव्ह  आहेत !  नंतर जेव्हा  त्यांची फेस बुक वरील प्रोफाईल पाहिल्यावर तेव्हा तर  त्यांच्या इतर रग्गड अ‍ॅक्टीव्हीटीज कळल्या.
ही  आहेत. ती त्यांच्या पोर्ट्रेट  च्या वेळची क्षणचित्रे





हे पहिले पेन्सिल स्केच

                                                                                         
                                                       सुरवातीचे वॉशेश


                                                          आकार घेऊ लागला !

                                


                                                           आणि हे झाले व्यक्तिचित्र तयार !      

आणखीन एक महीला चित्रकार माझ्या समवेत पहिल्यानेच निसर्ग चित्रणास आलेल्या होत्या त्यांनीही एक खाली दिलेले पोर्ट्रेट काढले !

हे सर्व आम्ही काहीच तसे एका बाजूला करित होतो, तो पर्यंत वर्गावर आलेले पसार झालेले होते. पण स्नेहल पागे ही पण आमच्या समवेतआलेली होती. नुकतेच तिने आपले अमेरिकेतील शिक्षण संपवून भारतात परतली आहे. ती ऑइल पेंट मध्ये लॅंड्स्केप काढीत होती , तिचेही काही फोटो  खाली देत आहे.



 तिचे काम चालू असतांना मी ही तिचे शुटींग केले, तिचे काही ब्रश स्ट्रोक्स पहाण्या साठी, ही बघा ती क्लीप.


बर्‍याच दिवसाने ही पोस्ट ब्लॉगवर आपल्या पुढे ठेवली आहे भट्टी जमली असेल तर नक्की सांगा !

12 comments:

uday.g.mohite said...
This comment has been removed by a blog administrator.
uday.g.mohite said...

Page amdam masstchhh..aavdala malaa..

uday.g.mohite said...

mastchhhhh....godd keep it up

प्रमोद देव said...

मस्त!
चित्र,चित्रण आणि लेखन...तिन्ही मस्तच झालंय!

kishori said...

all phots clips are seen...those are nice. specially portrait avadle. hubehub ale ahe !!

kishori said...

all photos and clips are good...
especially portrait is so nice.

Vijay Kakde said...

I was happy to see the clipping and photographs and would like to see more in future.
Vijay

Vijay Kakde said...

Liked the clipping and also the photgraphs.
Vijay Kakde

क्रांति said...

खासच! इतके दिवस तुम्ही काढलेली चित्रं पहात होते आणि आवडीचा शिक्का मारून पुढे जात होते. आज या ब्लॉगवर त्याचं अथपासून इतिपर्यंत चित्रण पाहिलं आणि खूप छान वाटलं. वेड्या बाईच्या पोर्ट्रेटची चित्तरकथा तर जामच आवडली. दुवेही आवडले.

Unknown said...

khup chaan....bhati jamli aahe....apla praasangik nirikshan..aani shabdarachna khup chaan aahe.....vistrut pratyakshike...sundar kalagun pahayla milale...khup chaan....artist aahat .....khup chaan watla

thank u

ashyach sundar goshti aamhal tumchya blog war milavyaat...tyasathi anek shubhechaa

Abhi said...

तुमचा उत्साह आणि चित्र...too good...

Harshad Khandare said...

अंत्यंत सुंदर..